पेरणी जवळ आली; खिशात दमडी नाही बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): खरीप हंगाम उंबरठ्यावर आला असून परंतु बँकांची कामगिरी अपेक्षेपेक्षा संथ असल्याचे दिसून येत आहे. पीक कर्ज वेग वाढवण्याची आवश्यकता असून अनेक शेतकरी अजूनही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँकांना मिळून १ लाख ५५ हजार २०१ शेतकऱ्यांना १ हजार ५९७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ २७ हजार ४४७ शेतकऱ्यांना २१३.३१ कोटी रुपयांचे कर्ज
जिल्हा बँकेची कामगिरी सर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी सर्वाधिक १९ हजार ५०७ शेतकऱ्यांना बँकेने ११२.४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सहकारी बँक क्षेत्राची कामगिरी इतर बँकांच्या तुलनेत सरस ठरत आहे.
092
वितरित करण्यात आले असून, हे उद्दिष्टाच्या केवळ १८ टक्के खातेदार आणि १३ टक्के रकमेपुरते तुलनेत टक्के वाटप मर्यादित आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडे ५४ हजार ९० शेतकरी आणि ६९७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी फक्त २ हजार ५७० खात्यांना ३६.१७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख
बँकांचाही समावेश आहे. खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेने तुलनेने चांगली कामगिरी करत १,१८६ शेतकऱ्यांना १३.०२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. तर अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि आयडीबीआय बँक यांची कामगिरी मर्यादित राहिली आहे. ग्रामीण बँकांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकने ४ हजार ९६ शेतकऱ्यांना ४८.०५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करत तुलनेने समाधानकारक प्रगती केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions